¡Sorpréndeme!

'धनुष्य'ने अखेर लक्ष गाठलं । पहा त्याच्या हॉलिवूड सिनेमाचे नवे अपडेट | Dhanush Latest News

2021-09-13 1,889 Dailymotion

अभिनेता धनुषचा बहुचर्चित हॉलिवूड सिनेमा ‘द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर’ या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हा धनुषचा पहिलाच हॉलिवूडपट आहे. या पोस्टरमध्ये धनुष एका हॉट एअर बलूनमध्ये पाय बाहेर काढून आरामात बसलेला दिसत आहे. त्याने पिवळ्या रंगाचे शर्ट घातले असून त्यावर निळ्या रंगाचा कोट आणि त्याच रंगाची पॅन्ट घातली आहे. लेखक केन स्टॉक यांच्या ‘द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर’ या पुस्तकावर या सिनेमाची कथा आधारित आहे. पुस्तकाच्या नावावरुनच सिनेमाचे नाव ठेवण्यात आले आहे. सिनेमाचे पोस्टर ‘सिने व्यापार विश्लेषक’ रमेश बाला यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केले आहे. सिनेमाचे चित्रीकरण मुंबई (भारत), ब्रुसेल्स (बेल्जियम), रोम (इटली) आणि पॅरिस (फ्रांस) अशा जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews